इंटरनेट स्नेही असणे,
इंटरनेट वापरता येणे,
इंटरनेटचा उपयोग करता येणे…
तीनही गोष्टी वेगळ्या आहेत.
सोशल मीडियाचे (सोसत नसला तरी) वापरकर्ते भलतेच हुशार असतात.
पण…
सोशल मीडिया हॅन्डल करणारे, त्या माध्यमावर लिखाण करणारे, त्या माध्यमात व्यवसाय करणारे कन्टेन्ट बद्दल किती गंभीर असतात…?
जे सोशल मीडियावर लिहितोय/मांडतोय, पब्लिश करतो आहोत ते तपासतो आहोत का?
केवळ तंत्रस्नेही असून चालत नाही… म्हणजे एखादी पोस्ट एखाद्या पोर्टलवरून कॉपी करून गुगल ट्रान्सलेट करून पोस्ट केली (असं सर्रास घडतं बरका), तरी ती न तपासता पोस्ट केल्यास अर्थच बदलतो अथवा अर्थ लागत नाही.
◆सोबत जोडलेल्या फोटोतली एजन्सी सोशल मीडियामध्ये काम करते.
◆स्वतःच्या प्रमोशनच्या पोस्ट्स मध्ये चुकीचे शब्द/रचना वापरल्या गेल्या तर ग्राहकाच्या मीडिया हॅन्डलवर कश्या प्रकारे काम करत असतील बरं ही मंडळी…? पोस्टमधल्या साधारण ४० वर्षानंतर असलेले सर्व लोकं अश्या वाक्यरचनेचा काय अर्थ काढावा…?

मीडियात काम करत असताना बेसिक्सकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
आपण कोण आहोत स्नेही की वापरकर्ते की उपयोगकर्ते…???
